फेब्रुवारीत पुन्हा पावसाचे सावट; पंजाब डख यांचा अंदाज ; शेतकरी मित्रांनो, हवामान बदलाच्या या काळात शेती कामांचे नियोजन करण्यासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी असा अंदाज दिला आहे की, १३ आणि १४ जानेवारी २०२६ या दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण राहील. मात्र, शेतकऱ्यांनो, या ढगाळ हवामानामुळे पिकांचे नुकसान होईल अशी भीती बाळगण्याचे कारण नाही, कारण पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे.
शेतकरी मित्रांनो, सध्याचे हे ढगाळ वातावरण हरभरा पिकाला फुले लागण्यासाठी आणि ऊस उगवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल, असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे. तसेच टरबूज आणि खरबूज यांसारख्या वेलीवर वाढणाऱ्या पिकांच्या लागवडीसाठी देखील हे हवामान पोषक राहणार आहे. १५ जानेवारीपासून ढगाळ हवामान निवळून पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.




















