२०२६ मध्ये अवर्षणाचा धोका अटळ – रामचंद्र साबळे – २०२६ हे वर्ष हवामानाच्या दृष्टीने कसे राहील, यावर भारतीय हवामान विभाग तसेच अन्य परदे-शी हवामान संस्थांनीही अंदाज व्यक्त वर्तविले आहेत. या वीं एल-निनोचे असेल आणि त्याचा प्रभाव पर्जन्यमानावर होईल, असे मत हवामान विभागासह हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आ-हे.२०२६ मध्ये एल निनो परत पइल आणि २०२७पर्यंत त्याचा प्रभाव कायम राहील, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र सांबळे यांनी म्हटले आहे. अतिवृष्टी, थंडीनंतर २०२६ मध्ये अवर्षण अर्थात दुष्काळाचा धोका वर्तविण्यात आला आहे. हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी यास दुजोरा दिला आहे. २०२५ हे वर्ष हवामानाच्या दृष्टीनेही काहीसे संमिश्रच होते पावसाने वर्षाचा बराच काळ मुकाम ठोकला. पावसाळा सरला, दसरा, दिवाळी येऊन ठेपली तरी पावसाने काही पाठ सोडली नाही, फळे, भाजीपाल्यांसह अन्नधान्यांचे मोठे नुकसान झाले. थंडीही पडली ती कडाक्याची, अद्यापही थंडी सुरूच आहे. हे सर्व परिणाम ‘ला निना’ मुळे झाले.
एल निनो स्थिती
एल निनो-दक्षिणी दोलन ही विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानावर आणि एल निनो म्हणून घोषित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उष्ण तापमानावर मोजली जाणारी एक हवामान प्रणाली आहे आणि विशिष्ट पातळीपेक्षा कमी तापमानाला ला निना म्हणतात. एल निनो आणि ला निना स्थितीचा भारतीय मान्सूनवर मोठा परिणाम होत असतो. एल निनो स्थिती असताना दुष्काळ पडतो आणि ला निना स्थितीत सरासरी किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो. जानेवारीत थंडीची तीव्र लाट असेल, हा हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.




















