नमो शेतकरी योजना, या शेतकऱ्यांचे हप्ते होनार बंद ; शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ८ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या आपल्या सर्व बांधवांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. पीक विम्याच्या आणि इतर कामांच्या धावपळीत असतानाच आता राज्य सरकार लवकरच तुमच्या खात्यात २ हजार रुपये जमा करणार आहे. शेतकऱ्यांनो, हा हप्ता निवडणुकांपूर्वीच देण्याचा सरकारचा मानस असून त्यासाठी सुमारे १८०० कोटी रुपयांच्या निधीची जमवाजमव सुरू झाली आहे.
परंतु, शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की हा हप्ता फक्त अशाच शेतकऱ्यांना मिळेल ज्यांची तांत्रिक कामे पूर्ण आहेत. ज्या शेतकऱ्यांनो तुमचे आधार सीडिंग झालेले नाही किंवा ज्यांचा ‘फार्मर आयडी’ अद्याप जनरेट झालेला नाही, त्यांचा हप्ता अडकू शकतो. मागच्या वेळी सुद्धा अनेक बांधव यामुळे लाभापासून वंचित राहिले होते, त्यामुळे ही कामे त्वरित पूर्ण करून घ्या.




















