आनंदाची बातमी: लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात! नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता, तर अखेर तो हप्ता आजपासून म्हणजे १३ जानेवारीपासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुढच्या २ ते ३ दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होतील. ज्या बहिणींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यात प्राधान्याने हे पैसे येत आहेत, त्यामुळे तुमचे बँक खाते एकदा तपासून पाहायला हरकत नाही.
सध्या सोशल मीडियावर किंवा काही न्यूज चॅनेलवर ३००० किंवा ६००० रुपये मिळणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत, पण अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आणि अधिकृत माहितीनुसार, डिसेंबर महिन्याचा केवळ दीड हजार रुपयांचा (१५०० रु.) हप्ताच वितरित केला जात आहे. त्यामुळे जास्तीच्या पैशांच्या खोट्या बातम्यांकडे दुर्लक्ष करून अधिकृत माहितीवरच भर द्यावा.




















